जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे लाभाचे प्रस्ताव मंजूर
मंडळाकडून DBT प्रणालीने रु.3 कोटी 62 लाख रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा -: प्रसाद गावडे
सिंधुदुर्ग
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु 3 कोटी 62 लाख एवढी रक्कम बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे. माहे फेब्रुवारी 2024 पासूनचे कामगारांचे प्रस्ताव ऑनलाईन पडताळणी विना प्रलंबित राहिल्याने संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा कार्यालयाने कामगारांचे प्रस्ताव छाननी करून ऑनलाईन मंजुरीस पाठविल्यांनतर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांचे फोनद्वारे लक्ष वेधून लाभाची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या सूचनेनंतर मंडळाकडून 36203000 एवढी रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा केली आहे.उर्वरित प्रस्ताव मंजुरीबाबत संघटनेकडून पाठपुरावा चालू असून ज्या कामगारांनी अद्याप पर्यंत चालू शैक्षणिक वर्षांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर केले नसतील त्यांनी एप्रिल 2025 पूर्वी ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.