You are currently viewing कलमठ येथे ८ मार्चला महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा…

कलमठ येथे ८ मार्चला महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा…

कलमठ येथे ८ मार्चला महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा…

कणकवली

जागतिक महिला दिनानिमित्त श्री फोंडकन देवी स्पोटर्स अकॅडमी व सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स, असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्चला सकाळी ७ वाजता कलमठ-बिडयेवाडी येथे “मिशन सिंधुदुर्ग एक धाव महिला एकतेसाठी” या टॅगलाईनखाली महिलांसाठी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा १० व १४ वर्षांवरील मुली,१८ वर्षांखालील मुली, खुला गट, ४५ वर्षांवरील महिला अशी पाच गटांमध्ये होईल. प्रत्येक गटांमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकाविणाऱ्यांना चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी रुपेश वाळके यांच्याकडे संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत- जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी समीर राऊत यांच्याकडे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा