You are currently viewing औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त

सिंधुदुर्गनगरी 

 मुंबई विभागीय तंत्र प्रदर्शन सन 2024-25 या वर्षी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोक्स्को, कुर्ला येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाटने प्रथम क्रमांक मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती औद्योगि प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी दिली आहे.

           या प्रदर्शनासाइी मुंबई विभागाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधून एकुण 53 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या, या मधील उत्कृष्ट 10 प्रतिकृतींची निवड राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी करण्यात आली.  औद्यागिक प्रशिक्षण संस्था फोडाघाटच्या “स्मार्ट रोड सेफ्टी” या प्रतिकृतीला विभागस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

 यावेळी सहसंचालक निकम तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉनबोक्स्को चे प्राचार्य यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. या प्रतिकृतीसाठी मेकॅनिक ऑक्टो इलेक्ट्रिशियन अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाचे शिल्प निर्देशक स्वप्निल विश्वंभरे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या यशाबद्दल जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख अधिकारी मोहारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाटचे प्राचार्य भूषण सोनवणे तसेच सर्व संस्था कर्मचारी सर्व सहभागी  प्रशिक्षणार्थी, निर्देशक, गट निर्देशक  यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस  शुभेच्छा  दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा