इन्व्हिटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत लीनांशा नाईक हिला सुवर्णपदक…
ओरोस
आय. एस. सी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित इन्व्हिटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा नाईक हीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
या स्पर्धेत लीनांशा हितेश नाईक हिने सहा वर्षाखालील मुलींमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अथर्व दिनेश सावंत याने १४ वर्षे खालील मुले गटात ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये तृतीय क्रमांक आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत मार्क जॉन्सन डिसूजा याने देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी स्पर्धकांना गाराम बर्गे इव्हेंट डायरेक्टर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग सौ विद्या शिरस, सहाय्यक क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, सहाय्यक क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनीही या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.

