You are currently viewing बुराण गल्लीतील रस्ता सोलिंग करुन रहदारीस मोकळा करुन देणे…

बुराण गल्लीतील रस्ता सोलिंग करुन रहदारीस मोकळा करुन देणे…

बुराण गल्लीतील रस्ता सोलिंग करुन रहदारीस मोकळा करुन देणे…

माजी नगरसेवक राजू लतीफ बेग ‌ यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

सावंतवाडी

सावंतवाडीत सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू असून बुराणगल्लीत नवीन पाईपलाईनचे काम चालू आहे. त्या ठिकाणी खोदाई करुन माती इ. रस्त्यावर इतरत्र टाकण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे. तरी काम पूर्ण झालेल्या भागाचे सोलिंग करुन रस्ता मोकळा व स्वच्छ करुन देण्यात यावा आणि त्यामुळे तेथील रहीवाशांना होणारा त्रास दूर करण्यात यावा. सदरबाबत यापूर्वी माजी नगरसेवक राजू लतीफ बेग यांनी
नगरपरिषदेचे एस. ओ. अंधारे साहेब यांना तोंडी सुचना देऊनही आजतागायत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब उचित नाही. तरी आपण सदर भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी योग्यती कार्यवाही करावी अशी विनंती माजी नगरसेवक राजू लतीफ बेग यांनी सावंतवाडी नगरपरिषद सावंतवाडी यांना निवेदन सादर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा