You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-१२ वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-१२ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

***************************************

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-१२ वे

__________________________

 

स्वामी चरिताचे करता वाचन । मन होते प्रसन्न । लाभे चित्तास समाधान । पहा हो अनुभव घेऊनी ।। १ ।।

 

कठीण झाला माणूस सारा । कुणी कुणाला देईना थारा ।

विनवणी तुम्हास गुरुवरा । काढा मार्ग यातुनी ।। २।।

 

ब्रह्मांडनायक तुम्ही । श्री सिद्धसाधक योगीराज तुम्ही ।

अवधूत स्वरूपात तुम्ही । जगती ख्यात समर्थ तुम्ही ।। ३ । ।

 

अक्कलकोटी येण्याआधी ।भ्रमंती स्वामींनी कुठे केली कधी ? । ही माहिती आधी । जाणुनी घ्या भक्तजन हो ।।४। ।

 

पूर्व-चरितातले स्वामींचे वावरणे । विविध नावांनी त्यांना ओळखले जाणे । विविध स्थानी स्वामींचे रहाणे । प्रचिती दिव्यत्वाची येईल आपणास ।। ५ ।।

 

अध्यात्म उपकारक । तसेच जीवन-प्रबोधक । आणि अज्ञान निवारक । येते कळुनी स्वामींच्या भ्रमण-कार्यातूनी ।।६ ।।

 

हिमालय ते अक्कलकोट हा स्वामींचा प्रवास । असे थोर

प्रबोधन-प्रयास । जन उद्धारण खास । कार्य त्यांनी केले ।।७।।

___________________________

श्री स्वामी चरिताचे क्रमशा : लेखन करी कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे – पुणे.

__________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा