You are currently viewing सौ. नेहा क्षितिज हुनारी यांचे UGC NET परीक्षेत यश

सौ. नेहा क्षितिज हुनारी यांचे UGC NET परीक्षेत यश

सौ. नेहा क्षितिज हुनारी यांचे UGC NET परीक्षेत यश

मालवण :

मालवणची सुकन्या वायरी येथील रहिवासी, सौ. नेहा क्षितिज हुनारी यांनी जानेवारी २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या UGC NET या परीक्षेत ९८.११ पर्सेंटाइल (PERCENTILE) मार्क मिळवून, घवघवीत यश संपादन केले आहे.

सौ. नेहा क्षितिज हुनारी, यांनी मुंबई विद्यापीठातून MBA Finance केले असून गेली ४ वर्ष मालवण इथे ‘NEHA’S COMMERCE CLASSES ‘ या नावाने कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स क्लासेस घेत आहेत. २०२३ मध्ये नेहास कॉमर्स क्लासेसच्या एका विद्यार्थिनीला १२वी बोर्डाच्या परीक्षेत अकाउंट मध्ये १००/१०० मार्कही प्राप्त झाले होते.

सौ. नेहा क्षितिज हुनारी, यांचे UGC NET ह्या राष्ट्रीय शैक्षणिक विभागातल्या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या PHD च्या तयारी साठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा