नेमळे येथे ८ मार्च रोजी ब्रम्हाडनायक नाट्यप्रयोग
सावंतवाडी
नेमळे-देऊळवाडी येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे शनिवार ८ मार्च रोजी रात्री ९.०० वाजता ब्रम्हाडनायक हा श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारीत पौराणिक २ अंकी ट्रिकसीनयुक्त संगीत नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
नेमळे येथील श्री देवी सातेरी मित्रमंडळ देऊळवाडीच्यावातीने पुरस्कृत या नाटकाचे आयोजन केले आहे. या नाटकाचे लेखक साईदास आपटे असून दिग्दर्शन संजय नागडे यांनी केले आहे, तर नेपथ्य उमेश पावणोजी, प्रकाश योजना संतोष गावकर, प्रमोद मेस्त्री यांनी केले आहे. सुत्रधार हनुमंत सरवणकर आहेत. नाटकाचे पार्श्वसंगीत श्रीकृष्ण कोंडूसकर, सुशील सावंत यांनी दिले आहे. तर नाटकातील कलाकारांना संगीतसाथ गजानन मेस्त्री करणार आहेत. वेशभुषा अमोल परब यांनी साकारली आहे. नाटकातील ट्रिकसीन पपू जबडे, उमेश पावणोजी यांची आहेत. रंगभूषा दिगंबर मोर्ये ध्वनीसंकलन रामकृष्ण मेस्त्री, अक्षय सरवणकर, हनुमंत सरवणकर यांनी सांभाळली आहे. या नाटकात जया गोरे, उमेश पावणोजी, रवींद्र केळुसकर, संतोष चव्हाण, अमर परब, श्रीकृष्ण कोंडूसकर, अमोल पावणोजी, हेमंत बावकर, पपू जबडे, अक्षय सरवणकर, हेमंत गोडकर, समीर सावंत, आशिष घोगळे, सुयोग कुडाळकर, अथर्व मराठे, श्रीराज कोंडूसकर योगिता सावंत, सेजल भाटकर, स्नेहल कुडाळकर, धनश्री नाईक, समृध्दी पेडणकर आदी कलाकार भुमिका साकारणार आहेत. संगीतप्रेमींनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे