You are currently viewing श्री क्षेत्र हरिहरेश्वर

श्री क्षेत्र हरिहरेश्वर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”श्री क्षेत्र हरिहरेश्वर”*

हरीहरेश्वर शिवकालीन मंदिर प्राचीन

घेता दर्शन देवस्थानांचे सुखी होते जीवनIIधृII

 

ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती पर्वत

हरिहरेश्वर वसले टेकड्यांच्या कुशीत

क्षेत्रास मिळाला भगवान विष्णूंचा आशीर्वादII1II

 

मंदिर वसले सावित्री अरबी संगम स्थानांत

माडपोफळी हिरव्यागार गर्द वनराईत

साक्षीला आहे नयनरम्य स्वच्छ निळा समुद्रII2II

 

बळीराजाकडून भूमी मागितली पाऊले तीन

वामनाने ठेवले दुसरे पाऊल या क्षेत्रापासून

अगस्ती मुनी विसावले हरिहरेश्वर क्षेत्रांतII3II

 

हरिहरेश्वर काळभैरव योगेश्वरी साक्षात

सिद्धिविनायक हनुमान बैसले साक्षीनं

हरिहरेश्वर आहे स्वयंभू जागृत देवस्थानII4II

 

समुद्रकिनारी आहे गायत्रीतीर्थ वक्रतीर्थ

सूर्यतीर्थ यज्ञकुंड ब्रह्मकुप विष्णुपद तीर्थ

अनेकांचे कुलदैवत आहे पवित्र तीर्थस्थानII5II

 

ब्रह्मदेवाने सावित्रीला दिला वर केला यज्ञ

हरिहरेश्वराच्या दक्षिणोत्तर बारा ज्योतिर्लिंग

देशातील तीर्थस्थानापैकी प्रमुख स्थानII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा