You are currently viewing कृपाळू त्राता

कृपाळू त्राता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृपाळू त्राता*

*************

सरतही आले जरी आयुष्य तरीही

आज आहेस तू माझ्या काळजात

 

अनेक अनुत्तरीत वास्तव भारलेले

छळते जिव्हारी या बेचैनी अंतरात

 

जन्म हे दानच अतर्क्य अनामीकाचे

केवळ खेळ कठपुतळीचा अव्याहत

 

बाहू पसरुनी नित्य झेलावे क्षणक्षण

जगता जगता स्मरत रहावे भगवंत

 

सत्कर्मात तो सदैव असतो जवळी

तोच एक त्राता कृपाळू आदिअनंत

*****************************(17 )*

*वि.ग.सातपुते.( भावकवी )*

प्रतिक्रिया व्यक्त करा