You are currently viewing हुमरमळा वालावल गावातील गुणी दशावतार कलाकार चंद्रकांत माड्ये यांचा आगळावेगळा सन्मान!

हुमरमळा वालावल गावातील गुणी दशावतार कलाकार चंद्रकांत माड्ये यांचा आगळावेगळा सन्मान!

हुमरमळा वालावल गावातील गुणी दशावतार कलाकार चंद्रकांत माड्ये यांचा आगळावेगळा सन्मान!

हौशी मित्र मंडळ हुमरमळा यांची संकल्पना!

कुडाळ

परीस्थिती जरी साथ देत नसली तरी श्री देव रामेश्वरांने या गुणी कलाकाराला साथ दील्यानेच आजही रंगमंचावर आपली दशावतारी कला सादर करुन गावाचे नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दशावतार कला जोपासण्यासाठी कांता माड्ये प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी सांगितले
हुमरमळा वालावल गावचे दशावतार कलाकार श्री चंद्रकांत माड्ये हे श्री देव रामेश्वर दशावतार कंपनी चालवत आहेत तसेच दरवर्षी महाशिवरात्र निमित्ताने या रंगमंचावर आपली कला सादर करीत आहेत यासाठी हुमरमळा वालावल गावातील हौशी मित्र मंडळांने एक आगळा वेगळा सन्मान केला पैशाची माळ सरपंच श्री अमृत देसाई यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित केले यावेळी हौशी तरुण मित्र मंडळाने आपल्या कोणा एका नावाचा उल्लेख न करता गावाच्या वतीने सन्मान श्री माड्ये यांचा केला
यावेळी सरपंच श्री अमृत देसाई, वालावल माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, शेखर परब, संकेत चव्हाण, प्रभाकर गुंजकर, दादा परब, प्रकाश परब, वैभव मांजरेकर, आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा