You are currently viewing देतो देवच घर आम्हाला….

देतो देवच घर आम्हाला….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देतो देवच घर आम्हाला….*

 

देतो परमेश्वर घर आम्हाला

माहित आहे का सांगा तुम्हाला…

 

काबाडकष्ट ते आईबाबाचे

दिवसरात्र ते राबावयाचे

कधी उपाशीतापाशी झोपा

पण ऱ्हायाला हवा हो खोपा

घर होऊ दे सांगायचे देवाला

देतो परमेश्वर घर आम्हाला…

 

काडी काडी ती जमून येते

पुंजी आयुष्य खर्चून जाते

विट विटेला जुळते मग

खूप पडते पायांना भेग

पण ऱ्हायाला घर होवोना

देतो परमेश्वर घर आम्हाला..

 

आम्ही राहतो देवाच्या घरी

सारे त्यानेच दिलेले तरी

मग घर ते कसे आमुचे

चबुतरा नि दार ही त्याचे

तरी देव्हारा वितभर त्याला

देतो परमेश्वर घर आम्हाला…

 

म्हणा देवा हे घर रे तुझे

आहे सुंदर तुलाच साजे

इथे काहीच नाही रे माझे

फुले फळे ही देतोस ताजे

तीच तोडून वाहतो देवाला

देतो परमेश्वर घर आम्हाला…

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा