You are currently viewing मोती तलाव लगत असलेल्या नाल्यामध्ये वन्यजीव कृत्रिम प्राणी बसवण्याचे काम हाती

मोती तलाव लगत असलेल्या नाल्यामध्ये वन्यजीव कृत्रिम प्राणी बसवण्याचे काम हाती

मोती तलाव लगत असलेल्या नाल्यामध्ये वन्यजीव कृत्रिम प्राणी बसवण्याचे काम हाती

सावंतवाडी

मोती तलावा लगत असलेल्या नाल्यामध्ये पुन्हा एकदा वन्यजीव कृत्रिम प्राणी बसणार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नगरपालिकेचे लक्ष वेधले होते.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून मोती तलाव लगत असलेल्या नाल्यामध्ये वन्यजीव कृत्रिम प्राणी बसवण्यात आले होते. त्यामध्ये वाघ ,हरिन, सांबर, बगळे असे वन्य कृत्रिम प्राणी बसवल्यामुळे सदरच्या परिसरात ते प्राणी आकर्षण ठरले होते त्यामुळे पर्यटनच्या दृष्टीने एक त्या परिसराला महत्त्व आले होते.
परंतु काही वर्षानंतर सदर कृत्रिम प्राणी जीर्ण होऊन तेथील काही प्राणी नाहीसे झाले होते तर काही मोडून पडले होते. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी नगरपालिकेचे लक्ष वे दोन सदर ठिकाणी पुन्हा कृत्रिम प्राणी बसवा असे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच नगरपालिकेने कार्यवाही करून पुन्हा सदरचे कृत्रिम प्राणी बसवण्याचे काम हाती घेऊन सदर कृत्रिम प्राणी आज पुन्हा त्याच ठिकाणच्या बसवण्याचे महत्वाचे काम त्यामुळे पुन्हा एकदा हाती घेतले आहे यामुळे पर्यटन वाढणार हे निश्चितच.
सदर कृत्रिम वन्यजीव प्राणी बनवण्याचे काम माजगाव येथील शिल्पकार काका सावंत यांनी ही कलाकृती सादर केली आहे. सामाजिक बांधिलकीच्या आव्हानाची दखल घेऊन हा उपक्रम लवकरात लवकर राबवल्याकारणाने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रवी जाधव यांनी काका सावंत व नगरपालिका यांचे आभार मानले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा