1 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त पहिला लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा पहिला लेख.( सौजन्य मिशन आयएएस अमरावती 9890967003)
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जे अधिकारी कार्यरत आहेत त्यामध्ये अपर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी व प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांचा समावेश आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी त्या मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाल्या. श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना संपूर्ण देश मेट्रो वुमन म्हणून ओळखतो. कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी असताना त्यांनी मुंबई मेट्रो मध्ये जे अतुलनीय काम केलेले आहे त्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना मेट्रो वुमन ही सार्थक पदवी दिलेली आहे .
1985 या वर्षाला दहावी 1987 वर्षाला बारावी 1990 यासाली बीए आणि 1992 या वर्षाला एम ए इंग्रजी ह्या परीक्षा त्यांनी गुणवत्तेत पास केल्या आहेत. कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्या या प्रशासकीय महिलेने एम एम आर डी ए व मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये जे उल्लेखनीय कार्य केलेले आहे ते शब्दातीत आहे.
मुळच्या सांगली येथे राहणाऱ्या सांगलीच्या विलिगं कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केलेल्या पुढे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या नागपूरला अतिरिक्त आयुक्त तसेच मुंबईला राज्यपालाच्या कार्यालयात राजभवन मध्ये सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे पुढे एम एम आर डी ए ला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून गेल्या आणि त्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कला शाखेत पदवी व पदवी नंतरचे शिक्षण झालेल्या व कोणतीही अभियांत्रिकी पार्श्वभूमी नसलेल्या अश्विनी भिडे यांनी एम एम आर डी ए व मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये जे अतुलनीय काम केले त्यामुळे मेट्रो वुमन या पदवीस पात्र झाल्या. सध्या त्या मुंबईला मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत
अश्विनी भिडे यांचे वडील सांगली येथील स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते. त्यांच्या वेळोवेळी बदल्या होत गेल्या .काही बदल्या तर तालुक्याच्या ठिकाणी झाल्या .त्यामुळे अश्विनी भिडे यांचे शिक्षण जिल्ह्याबरोबर तालुक्याच्या गावी,ही झाले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांना भाषण वादविवाद नाटक चित्रकला त्याची खूपच आवड होती.कुणाची जयंती असो पुण्यतिथी असो त्यांनी आपल्या भाषण कलेचे त्या त्या वेळेस प्रदर्शन केले. वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी आत्मसात केला. घरचे वातावरण शैक्षणिक होते. घरच्या सर्व मंडळींनी अश्विनी भिडे यांना तिच्या भाषण वादविवाद नाटक चित्रकला या गोष्टींना सतत प्रोत्साहन दिले. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांचा उत्साह वाढला
एवढ्या सगळ्या उपक्रमात भाग घेऊनही अश्विनी दहावीच्या परीक्षेमध्ये मेरिट आल्या .तसेच बारावीच्या परीक्षेतही सातव्या क्रमांकाचे मेरीट प्राप्त करून त्यांनी भाषण वादविवाद नाटक चित्रकला यात भाग घेतल्यामुळे गुणवत्तेत कुठलाही फरक पडला नाही. .
सुप्रसिद्ध आयएफएस अधिकारी तेव्हाचे परराष्ट्र सचिव व कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी तसेच चांगुलपणाची चळवळ व पुढचं पाऊल या मराठी आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या परराष्ट्र सचिव असलेल्या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे मार्गदर्शन मिळाले. पुढे इंग्रजीमध्ये एम ए करण्यासाठी त्यांनी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यासाला सुरुवात केली. एम ए इंग्रजी पदवीतही अश्विनी भिडे यांनी आपली यशोगाथा कायम ठेवली .या परीक्षेमध्ये गुणवत्तेत दुसरी आली आणि लगेच सांगलीच्या महाविद्यालयात प्राध्यापक पदाची मागणी पण आली. इकडे पदवी आणि तिकडे नोकरी हा सुवर्णयोग चालून आला .
अभ्यासातील सातत्य सकारात्मक दृष्टिकोन चिकाटी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील अभ्यास यामुळे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपजिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण केली. रुजू होणार तेवढ्यात आयएएस पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि त्यातही पास . आता नजरेसमोर दोन गोष्टी होत्या .एकतर उपजिल्हाधिकारी नाहीतर जिल्हाधिकारी. अर्थातच यातला जिल्हाधिकारी हा प्राधान्यक्रम निवडला आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या समोर व मुंबई महानगरपालिकेच्या समोर असलेले हे केंद्र इथल्या गुणवत्तेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मुंबईला सर्वात मोठा प्रश्न येतो तो राहण्याचा. महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले वस्तीगृहात प्रवेश मिळाला. काळजीपूर्वक आयएएस परीक्षेची तयारी केली आणि संपूर्ण भारतातून नववा क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्रातला नावलौकिक प्राप्त करून दिला. सर्वात महत्त्वाचं मुलीमधून पहिला येण्याचा मान देखील त्यांना प्राप्त झाला. कला शाखेत राहिलेल्या इंग्रजीमध्ये एम ए परीक्षा पास झालेल्या वादविवाद चित्रकला अभिनय भाषण या क्षेत्रामध्ये महाविद्यालयीन जीवनात वावरणाऱ्या अश्विनी मॅडमनी जे यश संपादन केलेले आहे ते खरेच खरंच आदर्शवत आहे .आता सध्या त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना अग्रीम हार्दिक शुभेच्छा .
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प महाराष्ट्र
9890967003