You are currently viewing रोजच करतात गंगा स्नान

रोजच करतात गंगा स्नान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रोजच करतात गंगा स्नान*

 

अखेर दिवशी मारून डुबकी

कृतार्थ झाला संगम त्रिवेणी

*रोजच करतात गंगा स्नान*

साधली आज शिवरात्र पर्वणी

//1//

नदी वहाते *बाराही महिने*

कौतुक त्याचं आहे कुणास

वाळू उपसून *खिसे भरती*

आणि करती वरती *मिजास*

//2//

वैशाखातील *अव कृपेची*

माया होतसे येथे *पातळ*

जरी वहाते पाणी *झुळझुळ*

नाद करतात घुंगरू खुळखुळ

//3//

उडवत जातात *गुरे धुरळा*

डोळा संध्येचा होतो तिरळा

कळतही नाही रवीराजाला

खालमानेने जातो अस्ताला

//4//

बिनधास्त अशी ती गुरे वासरे

परतून येती आपल्या घराला

गुंडाळून गाशा *सूर्य* तयाचा

मोकळा होतो डुबकी मारायला

//5//

कौतुक संपले आता *कुंभाचे*

वेध लागले फाल्गुन शिमग्याचे

तसा तर असतो *बारा महिने*

*कौतुक करत “संविधानाचे”*

//6//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा