You are currently viewing  “माय मराठी”

 “माय मराठी”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

  *”माय मराठी”*

माय मराठी भाषा उमदी उभरी उदार

सर्वांना घेई सांभाळून राखी आदरIIधृII

 

म्हाइंभट मुकुंदराज ज्ञानोबा होत ऐश्वर्य

आकलन कल्पना अभिव्यक्ती होत संस्कार

माय मराठी प्राचीन होत नित्य वापरII१II

 

श्री शिवछत्रपतींनी वापरली आग्रहानं

राजभाषा कोश घेतला सिद्ध करून

सर्वत्र कटाक्षाने केला मराठीचा वापरII२II

 

नामदेव एकनाथ तुकारामांचे योगदान

रामदासादी संतांनी केली अधिक समृद्ध

संत काव्याने केले अजरामर संस्कारII३II

 

मातृभाषेतून लेख काव्याला फुटतो अंकुर

अध्यात्म तत्त्वज्ञानाला मराठीतून येई बहर

अभिमानानं मराठीचा करू सदा वापरII४II

 

अमृताते पैजा जिंकु शकणारी आहे मधुर

विश्व कल्याणार्थ पसायदान मागणारी थोर

चौदा विद्या चौसष्ट कला विज्ञानाचे भांडारII५II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा