You are currently viewing कुडाळ हायस्कूलच्या इयत्ता (९वी इ च्या मुलांनी) उत्साहात साजरा केला मराठी भाषा गौरव दिन

कुडाळ हायस्कूलच्या इयत्ता (९वी इ च्या मुलांनी) उत्साहात साजरा केला मराठी भाषा गौरव दिन

कुडाळ :

गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडाळ हायस्कुलच्या इयत्ता ९वी इ च्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.

आधी आठ दिवस या कार्यक्रमाचे नियोजन मराठीचे शिक्षक श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मुलांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.

आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून साफसफाई केली. वर्ग एखाद्या पॉलिश केलेल्या हिऱ्यासारखा लख्ख केला.

२७ तारीखला लवकरच सर्वजण शाळेत जमा झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साहाचे आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत होते. जीवन, तन्मय, भार्गव व इतर मुलांनी मिळून विविध रंगाच्या फुलांनी रांगोळी काढली. या रंगीबेरंगी रांगोळीमुळे वर्गाला नव चैतन्याचे रूप प्राप्त झाले होते. सुधांशू धुरी याने आपल्या वळणदार व सुंदर हस्ताक्षरात फलक लेखन केले. आज मराठी भाषेतील मोती फळ्यावर चमकत होते .

कार्यक्रमाचा श्री गणेशा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वऱ्हाडे सर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या आगलावे व वरदा वारंग यांनी केले. मुख्याध्यापक आदरणीय श्री वऱ्हाडे सर , उप मुख्याध्यापक आदरणीय श्री भोगटे सर , पर्यवेक्षक तेली सर व आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गोसावी सर व श्री ओरोसकर सर या सर्वांचेच स्वतःतयार केलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वराज मसुरकर याने *महाराष्ट्राच्या मातीत रुजली माय मराठी* या माय मराठीला वंदन करून मराठी भाषेविषयी प्रभावी असे भाषण केले. समृद्धी सरनाईक हिनेही भाषण केले.

वरदाने आपल्या मधुर आवाजात गाणे म्हटले. आर्या आगलावे समृद्धी व वरदा यांनी मैत्री यासंबंधी मुलाखत घेतली. वल्लरी कोचरेकर व वसंत वारंग यांनी कथा सादर केल्या. आयुषी, साईनी, आर्या, समृद्धी, वरदा यांनी गाणे म्हटले. उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. मराठी भाषेची महती सांगितली.

आभार प्रदर्शनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अर्णव तळेकर याने पार पाडली. अशा प्रकारे आदरणी गोसावी सर यांच्या प्रेरणेतून हा मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. अभिजात दर्जा प्राप्त झालेली मराठी भाषा विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम या कार्यक्रमातून झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा