*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिवशंभू भोलेनाथ*
शंभो शंकरा शिव भोले नाथा विश्वेश्वरा
नमितो आम्ही करुणा सिंधु भव दुःख हरा।।धृ।।
भगीरथी गंगा जटेत सामावणारा
नृत्य कला संगीत दाता नटेश्वरा
विश्वशांती दाता कल्याण करणारा।।1।।
सागर विष प्राशुनी अमृत देणारा
असुरा वध कर्ती भाऱ्या शोभे गौरीहरा
श्रीगणेश कार्तिकेय सुकुमार शोभणारा।।2।।
निळकंठ भस्म विलेप गळा सर्प धरा
गळा रुद्र माळ त्रिशूल करा डमरु धरा
सकळ रक्षिता इच्छा पूर्ण करणारा।।3।।
बारा ज्योतिर्लिंग दाविती ऊर्जा साक्षात्कार
नवनाथांचे गुरु शोभती श्री ज्ञानेश्वर
शंकराचार्य वसले हिंदुधर्म प्रचारा।।4।।
काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.