You are currently viewing मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक.

मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक.

*मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक.*

*गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन.*

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना निवेदन देत कुडाळ त्यातून अवैधरित्या होणारी दारू गुटखा व अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पालकमंत्री यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई का होत नाही असे विचारल्यावर उत्पादन शुल्क निरीक्षक निरीक्षक यांनी मनुष्यबळ कमी असल्याची हातबलता बोलून दाखवली. यावर मनसेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागास रस्त्यावर उतरून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन देत आपण कुडाळ पोलीस निरीक्षक यांची मदत घेण्याचे सुचविले.तसेच येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरूपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटांना तथा बोंब मारो आंदोलन करेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर,माजी उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष नेरुर अनिकेत ठाकुर,अक्षय जोशी,सुरज नेरूरकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा