You are currently viewing सांगेली चर्मकार वस्तीला संत रोहिदासांचे नाव द्या…

सांगेली चर्मकार वस्तीला संत रोहिदासांचे नाव द्या…

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाची, जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी…

सिंधुदुर्गनगरी
सांगेली ता.सावंतवाडी येथे मोठ्या प्रमाणात चर्मकार वस्ती असून संबंधित वस्ती अन्य समाजाच्या वाडीत गणली जात आहे.संबंधित वाडीचे विभक्तिकरण करून स्वतंत्र दोन वाड्या कराव्यात व चर्मकार वस्तीस संत रोहिदासनगर असे नामकरण करावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केली आहे.
सांगेली येथे सुमारे दीडशे हुन जास्त लोकसंख्येची तीस घरे व कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व वस्ती आजतागायत अन्य समाजाच्या वाडीस जोडली गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने स्वतंत्र वाडी होणे आवश्यक असल्याने सदर वाडीचे विभक्तीकरण करून चर्मकार वस्ती असलेल्या वाडीस संत रोहिदास नगर असे नाव द्यावे अशी मागणी तेथील चर्मकार समाजाची असल्याने त्यांची मागणी पूर्ण करावी असे निवेदन मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा