*विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली यांची जी.जे.सी फार्मास्युटिकल इंडस्ट्री येथे व्हिजिट*
कुडाळ
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल कणकवली येथील ११५ विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी जीजेसी फार्मास्युटिकल इंडस्ट्री,विटा येथे औषधनिर्माण कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी व्हिजिट केली. या व्हिजिटमध्ये प्राचार्य डॉ. राजेश जगताप आणि महाविद्यालयाचे चार प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती प्रक्रियेची सखोल माहिती मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या व्हिजिटमध्ये प्लांट मॅनेजर श्री. विकास सावंत यांनी औषध निर्माण प्रक्रियेविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योगातील विविध विभागांची कार्यप्रणाली, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता मानकांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणाशी परिचय करून दिला तसेच त्यांना संभाव्य करियर संधींबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या व्हिजिटच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. राजेश जगताप, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. चंद्रशेखर बाबर, विभागप्रमुख प्रा. अमर कुलकर्णी आणि डॉ. अमोल उबाळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. निखिल गजरे आणि प्रा. प्रणाली पांगम यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले, तसेच प्रा. स्वप्नाली पाटील व प्रा. शार्दुल कल्याणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
युवक कल्याण संघ चे अध्यक्ष श्री. वैभवजी नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे या व्हिजीटच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.