You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तर्फे मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रमाचे आयोजन

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तर्फे मराठी भाषा गौरव दिवस कार्यक्रमाचे आयोजन

*भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये होणार कार्यक्रम*

सावंतवाडी :

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच *मराठी भाषा गौरव दिवस.* गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून भोसले इंटरनॅशनल स्कुल, महादेव भाटले, शिल्पग्राम रोड, खासकीलवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारा मराठी भाषा गौरव दिवस हा पहिलाच कार्यक्रम आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सकाळी ९.३० वा. ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर, ज्येष्ठ साहित्यिक, मालवणी कवी दादा मडकईकर यांचा खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा *”आठवणीतील जुन्या कविता”* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच कोमसापचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा