You are currently viewing गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेतर्फे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांचेकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर

गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेतर्फे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांचेकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर

मुंबई :

गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज २५ फेब्रुवारी रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सन्मा. संजय शिरसाट यांची भेट घेऊन यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात गाबीत या जातीचा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत, गाबीत समाजाला आरक्षणाचा फायदा मिळविण्यासाठीच्या तरतूदी बाबत, शासन निर्णयानुसार गाबीत समाजाला दाखले मिळने बाबत, गाबीत समाज महामंडळ होणे बाबत मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदन सादर करतेवेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुजय धुरत, संस्थेचे सरचिटणीस गणपत (बाळ) मणचेकर, संस्थेचे खजिनदार श्री प्रवीण सरवणकर, विकास कुबल आदी मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा