*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असाल जरी तुम्ही किती हुशार*
साखर झोपेत बरळत उठली
आवळे चिंचा द्या मज आणुन
यादी घेऊन *गाठली मंडई*
चिंचा गुरमटलेल्या आलो घेऊन
ठेवून द्याव्या *तुळशीपाशी*
चकीत झालो *हुकूम* ऐकून
ऐकले नव्हते *अजून पर्यंत*
तुळशीला ओकताना मी चुकून
झालो विचारता *मासाहेबाना*
ऐकून *उडालो शंभर फूट*
राधेला म्हणे *खावेसे वाटले*
कशाला पंचायती अन काथ्याकूट
हळूच काढत विषय रात्रीचा
सौ.नेच आमच्या दिला धक्का
ओच्यात आणल्या चिंचा चार
चाहूल तीस-याची कळला धोका
परदेशाचा *जाॅब* भोवला
रहात नव्हतो *डेली कनेक्ट*
नव्हता जमाना सुरू जाहला
त्यात ऐकायचा होता डिफेक्ट
*लग्न तुळशीचे* पडता पार
घेऊन बायकोला झालो पशार
सावध रहावे *चिंचे पासून*
असाल जरी तुम्ही किती हुशार.
विनायक जोशी🖋️ठाणे
9 3 2 4 3 2 4 15 7