*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावरकर म्हणतात*
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
मज नको मोक्ष वा मुक्ती ।
मी करितो केवळ स्वातंत्र्य देवीची भक्ती
अंदमानच्या यातना अणुमात्र करू न शकल्या कमी
माझी देशावरची प्रिती
आम्ही वारस छत्रपतींचे ,शंभूराजे, राणा प्रतापचे
वारस आम्ही शूर पेशव्यांचे
तुच्छ आम्हास गौरव तुमचे
प्रीय आम्हा दोर फाशीचे
आमची मस्तके वाहू आम्ही स्वतंत्रतेच्या चरणी
स्वातंत्र्याचे पुत्र आम्ही,माघार कधी ना घेऊ
सुवर्ण भारत पुन्हा उभवू
हीच आमची भक्ती आणि हीच मोक्ष— मुक्ती
विद्या रानडे