You are currently viewing रंगबावरे

रंगबावरे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🌹🌿रंगबावरे🌹🌿*

 

निळे रेशमी आभाळ

उडे पाखरांचा थवा

पूर्वा उजळे केशरी

सोनसळी रंग नवा!!

 

रान पोपटी हिरवे

फांदीतून छान डोले

लाल केशरी धवल

रंग लेवून खुलले!!

 

काळ्या करड्या वाळूसवे

खळखळते सरिता

नाद गुंजतो कानात

ऐकताना मोद चित्ता!!

 

उन्हं पिऊन दुपार

आता जरा सुस्तावली

लागे सांजेची चाहूल

हळू येतेच सावळी!!

 

गडदता रात्र काळी

चंद्र येई आभाळात

चमचमत्या चांदण्या

रजत रस बहरात!!

 

सोहळा निसर्गाचा

भरतो *रंगाचा* गाभारा

मनी जागे श्याम धून

खुले निसर्ग पिसारा!!

🌹

(सकाळ, दुपार, संध्या, रात्र )

 

*अरूणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा