मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांची कारवाई
संशयितास १० हजार रुपयांचा दंड
सावंतवाडी :
मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील चार चाकी गाडी भरधाव वेगात चालवत सावंतवाडी शहरातील काही दुचाकींना ठोकर देत पळून जाणाऱ्या आजरा येथील नितेश पांडुरंग ठाकूर याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई करत त्याला आज येथील न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास घडला होता.
नितेश ठाकूर हा आपल्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातून भरधाव वेगात कोल्हापूरच्या दिशेने जात होता यावेळी त्यांनी शहरातील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या काही गाड्यांनाही धक्का दिला होता हा प्रकार वाहतूक पोलिसांना समजतात त्यांनी नागरिकांच्या सहाय्याने संबंधित कारचालकाला बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले होते. त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई करत त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तब्बल दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली हे कारवाई वाहतूक पोलीस सुनील नाईक आणि मयूर सावंत यांनी केली.