*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अगं… ए कविता*
अगं… ए कविता,
कुठे चालली कविता?
कवीच्या विचारात
राहून घेते जरा
कल्पनेच्या विश्वात
फिरून येते जरा
तिथे काय असते
काय काय दिसते?
कल्पनेच्या विश्वात
गमतीजमती भारी
निसर्ग सौंदर्याची
करून येते सफारी
आणि काय दिसते
सांगशील का जरा?
खूप सारे पशुपक्षी
जंगलात सवारी
आकाशात पाहू तारे
घेऊन उंच भरारी
आणखी नवीन काही
दिसते का ते सांग?
काय सांगू कल्पनेच्या विश्वात
असंख्य गोष्टी असतात
कवी म्हणे सारे
जे न पाहे रवी ते ही पाहतात
आम्हाला पण
तुझ्या सोबत नेशील का?
कल्पनेचे विश्व दाखवशील का?
शोधा एखादा कवी
जावे त्याच्या विचारात
कल्पनेच्या विश्वाची
घेऊन मजा रहावे आनंदात
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.