You are currently viewing धनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे

धनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे

वृत्तसंस्था:

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस चांगली बातमी घेऊन आला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा हिने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली माहिती समोर येत आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहमतीच्या संबंधाचा खुलासा केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहीण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी अस्वस्थ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

प्ले बॅक सिंगर म्हणून कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता.

रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्याशी १९९७ मध्ये त्यांची ओळख झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा