*सावंतवाडी येथे परीट समाजातर्फे संत गाडगे महाराज जयंती व स्नेह मेळावा उत्साहात साजरा*
सावंतवाडी
सावंतवाडी येथे राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराज यांची 149 वी जयंती व सिंधुदुर्गातील परीट समाज बंधू-भगिनींचा तिसरा स्नेह मेळावा सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला
सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने सावंतवाडी नगर परिषदेला राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छता मोहीम राबवण्याचे निवेदन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. त्याची पूर्तता म्हणून सावंतवाडी नगर परिषदेने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा “महास्वच्छता अभियान” राबविले त्यात सर्व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय, शाळा, कॉलेज,तसेच सामाजिक संस्था, महिला बचतगट , परीट समाजातील बंधू-भगिनी व सावंतवाडी शहरातील नागरिक यांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन “स्वच्छता हीच सेवा ” या गाडगेबाबांच्या शिकवणीला सर्वांनी आदरांजली अर्पण केली.
मालवण येथील शशिकांत चव्हाण यांनी गाडगेबाबांची वेशभूषा साकारली होती व स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन संपूर्ण सावंतवाडीकरांचे लक्ष वेधून घेतले. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सावंतवाडी तालुका आयोजित जिल्हा स्नेह मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मडवळ हितवर्धक मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष श्री लक्ष्मण गावकर तालुकाध्यक्ष श्री मोहन वालकर, राजेंद्र भालेकर, श्रीकृष्ण परीट, सदानंद अनावकर, महेंद्र आरोलकर, भालचंद्र करंजेकर, विजय पाटील,, शेखर कडू, दीपक नारकर, माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर अक्षता कुडाळकर, स्वप्निल कदम, दीपक चव्हाण, विलास साळसकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा सत्कार देवगड तालुका मालवण तालुका सावंतवाडी तालुका व जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परीट समाज बांधवांचे यशस्वी असे संघटन केल्याबद्दल मालवण तालुक्यातील सावंतवाडी आर्ट कॉलेजमध्ये शिकत असलेला निलेश चव्हाण यांनी संत गाडगेबाबा यांची रेखाटलेली तस्वीर व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले संत गाडगेबाबा जयंती व जिल्ह्याच्या स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी संत गाडगेबाबा यांच्या नावाने सभागृह बांधण्याचा मानस आहे सरकार दरबारी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ते शक्य होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सभागृह बांधण्याचा प्रयत्न करूया.
यावेळी ज्येष्ठ समाज बांधव मधुकर मोरजकार, देवेंद्र हॊडावडेकर , मनोहर रेडकर, जगन्नाथ वाडकर, उत्तम चव्हाण, आप्पा परुळेकर, वसंत शाकाहार,शरद परीट, शांताराम कडू, बाळा पाटणकर व सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी मराठा मडवळ हितवर्धक मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष श्री लक्ष्मण गावकर व इतर मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बाल कीर्तनकार कु. वेदिका आप्पा लुडबे हिने श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित सुश्राव्य असे किर्तन केले त्यानंतर महाप्रसाद व महिलांसाठी हळदी कुंकू व सुश्राव्य भजन इत्यादी कार्यक्रम करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला जितेंद्र मोरजकर,दयानंद रेडकर, लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, संजय होडावडेकर, रितेश चव्हाण, सुरेंद्र कासकर, सुरेश पन्हाळकर, किरण वाडकर, भगवान वाडकर, संदीप बांदेकर, दिनेश होडावडेकर, अनिल होडावडेकर, रुपेश माणगावकर, स्वप्निल कदम, प्रदीप भालेकर, शेखर होडावडेकर , अमित हॊडावडेकर, सुनील वाडकर व सर्व महिला भगिनींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष असे योगदान दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केले.