आजऱ्यातील मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाने चार गाड्या उडविल्या…
सावंतवाडीतील प्रकार; प्रकरण पोलीस ठाण्यात, चौकशी सुरू…
सावंतवाडी
मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका कारचालकाकडून चार गाड्या उडविण्याचा प्रकार सावंतवाडीत घडला. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. त्याला अखेर येथील बसस्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. हा प्रकार आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला नितीन ठाकूर (रा. आजरा) असे त्याचे नाव आहे. उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून आजऱ्याच्या दिशेने जात असताना नितीन ठाकूर यांनी मद्यधुंद अवस्थेत शहरातील चार गाड्या उडविल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान येथील स्थानिकांनी त्यांचा पाठलाग करून येथील बस स्थानक परिसरात त्याच्यासह अन्य चार जणांना ताब्यात घेतले व पोलिसांच्या ताब्यात दिले. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याने उशिरापर्यंत त्यांच्यावर कारवाई सुरू होती.