*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी मराठी भाषा* 🚩🚩🚩
*(अष्टाक्षरी*)
महा राष्ट्रात माझिया
नांदे मराठी माणसं
त्याच्या मुखात रुळते
भाषा मराठी सरस
माझ्या मराठी भाषेत
साज शब्दा लंकाराचा
चला करु जयघोष
आज माझ्या मराठीचा
महाराष्ट्र राज्य थोर
कष्ट करी बळीराजा
काळया आईचा आशिष
असा महाराष्ट्र माझा
माझी माती पुण्यवान
भावनेत तिचा ध्यास
एक एक असे श्वास
मराठीचा नित्य भास
ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी
संत तुकोबाची गाथा
माती मातीच्या कणात
नित्य टेकतसे माथा
दरी दरीत घुमतो
लोक संगीताचा नाद
रांन पाखरे गुंजती
माय मराठीला साद
कृष्णा नर्मदा गोदाई
जल दायिनी सर्वदा
भुमी संतांची पावन
करू नमन शतदा
माझ्या माय मराठीत
लावणीही झंकारते
नाद ऐकता डफाचे
पायी घुंगरू नाचते
महाराष्ट्र माझा थोर
गुण गावुया खुशीत
सप्त जन्मातही घेऊ
जन्म त्याच्याच कुशीत
*शीला पाटील. चांदवड.*