प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण
दोडामार्ग
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत झोळंबेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात घरकुल मंजुरी पत्राचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमात गणेशप्रसाद गवस संरपच विशाखा नाईक उपसरपंच विनायक गाडगीळ तंटामुक्त अध्यक्ष सुखाजी गवस पोलीस पाटील संजय गवस माजी सरपंच प्रभावती गवस सदस्य विनिता गवस संजना गवस ग्रामसेवक परब विस्तार अधिकारी पंचायत समितीत दोडामार्ग जाधव मुख्याध्यापक देसाई सर व लाभार्थी उपस्थित होते