मडुरा येथील उबाठा गटाचे विभाग प्रमुख उल्हास परब यांच्यसह शेकडो कार्यकर्ते भाजपात
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
सावंतवाडी
मडुरा येथील उबाठा गटाचे विभाग प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब यांच्या नेतृत्वात मडुरा व अन्य गावातील उबाळा सेनेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री
ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व कार्यक्रमात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
उबाठा गटाचे पदाधिकारी पांडुरंग तळवणेकर, नारायण मयेकर, आत्माराम धुरी, भगवान धुरी, चंद्रकांत धुरी, अमोल गावडे, अरुण तळवणेकर, उल्हास परब, स्वप्नील परब, सुमित्रा धुरी, साबाजी धुरी, दत्ताराम जाधव, लिंगाजी जाधव, निलेश जाधव, पांडुरंग राऊळ, आनंद पेडणेकर, संतोष परब, गोपाळ धुरी, अशोक पायनाईक, अभिजित मयेकर, आदेश मयेकर, बाळकृष्ण जाधव, अशोक पायनाईक, मनोहर मयेकर, संचिता धुरी, श्रृतिका कांबळी, शामल केरकर, बाबु कांबळी, निकिता केरकर, स्वप्निल रघजी, अश्विनी रघजी, कार्तिका रघजी, काजल मांजरेकर, प्रथमेश विर्नोडकर, साहिल कांबळी, दिगंबर कांबळी, अक्षय मोर्ये, प्रतिक्षा मोर्ये, विजय धुरी आदींनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
आपणा सर्वांचे भारतीय जनता पार्टीच्या परिवारात स्वागत असून तुमचा पक्षात निश्चितच सन्मान केला जाईल असा विश्वास यावेळी नामदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. ही तर सुरुवात आहे यापुढेही उबाठा व महाविकास आघाडीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यास इच्छुक असून त्यांचेही टप्प्या टप्प्यात प्रवेश घेतले जातील असेही यावेळी नितेश राणे यांनी स्पष्ट केले.