You are currently viewing भे ग

भे ग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भे ग*

 

तहान लागता हसली धरणी

विलग होऊन गेले *ओठ*

रंगीत टोप्या सांगू लागल्या

उघड करणार ती आपल कपट

पटपट गेले निरोप सर्वाना

मोबाईल सुटले सुसाट

कळली बातमी दिल्लीत आधीच

आत टाकल फाटक्या तोंडाना

अजून होते *चर्चा नोटांची*

आवाज येतो कूजबुजल्याचा

बातमी उठली *आणी बाणीची*

कुठे *भेग* अन कुठे बातमी

वृत्त स्वातंत्र्याची *ऐशी तैशी*

हळूच धरा ती खुशीत हसली

नकली संपादकांनी बातमी रेटली

स्पर्धा टीआरपीची उगा पेटली

त्यात कुणाची लेखणी जळाली

शीळ्या कढीला आणून *ऊत*

गप्प बसतील ते कसले *रावत*

लिहून टाकले *मथळे* मोठे

धीर कसा तो *यांना* नाही

सायंकाळी *रंगीत* सभेला

देत असतात ते दीर्घ *जांभई*

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा