*▪️दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा*
*▪️शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन*
*शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची संख्या लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.*
*सकाळी 11:30 वाजता माजी सभापती बाळासाहेब हरयाण, प्रसिध्द उद्योजक श्री.विजय तावडे तसेच दिगशी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय।”, “जय भवानी जय शिवाजी” , “तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” अश्या घोषणांनी दणाणून गेला.*
*यानंतर श्री. गांगेश्वर विद्यामंदिर दिगशी या शाळेतील मुलांनी सुंदर नृत्य सादर केले.तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.*
*दुपारी उपस्थित सर्व शिवभक्तांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.*
*सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*
*यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.*
*यावर्षीची पैठणीच्या मानकरी ठरल्या श्रीमती. विजयश्री धुरी,द्वितीय सौ. रुचिता सोलकर तर तिसरा क्रमांक आला सौ.सुहासिनी धुरी.*
*या सोबतच उपस्थित सर्वांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.*
*प्रेक्षकांना देखील लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसे जिंकता आली.*
*या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेला सर्व स्पर्धांची बक्षीसे दरवर्षी प्रमाणे श्री. सुरेश मांडवकर यांच्या कडून देण्यात आली.*
*या वर्षी हळदीकुंक समारंभासाठी होणारा खर्च श्री. नितीन सराफ यांच्याकडून करण्यात आला.*
*रात्री दिगशी येथील ढोल पथकाने या कार्यक्रमाला अजूनच शोभा आणली.ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला.*
*रात्री उशिरा बुवा श्री.मोतीराम सोलकर,सुरेश मोरे यांच्या सुस्वर भजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.*
*या कार्यक्रमासाठी माजी सभापती बाळा हरयाण, प्रसिद्ध उद्योजक विजय तावडे ,नासिर भाई काझी , सरपंच प्रियंका हरयाण, माजी पोलीस पाटील गणेश हरयाण,संतोष हरयाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साजिद काझी , सोसायटीचे चेअरमन ब्रम्हा हरयाण,पोलीस पाटील श्रीकांत पाष्टे ,ग्रामपंचायत सदस्या रिहाना काझी,सायली धुरी, ओमकार हरयाण ,संतोष हरयाण, सखाराम मंचेकर ,राजू सावंत, मंगेश सावंत ,अतुल मोरे, जयराज हरयाण, गुलजार काझी, स्वरा काडगे ,सुप्रिया मंचेकर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.*
*यावेळी उपस्थित सगळ्यांचे व ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्यांचे शिवप्रेरित युवा संघटनेचे अध्यक्ष श्री .स्वप्निल (पप्पू) धुरी यांनी आभार मानले.*