*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संचिताचे रांजण*
****************
मी जगती फक्त जगत राहिलो
क्षणाक्षणांनाच झेलीत राहिलो
काय लाभले हिशेब केला नाही
दान ओंजळीतले जपत राहिलो
पंचभुतांचा दृष्टांत नित्य लोचनी
निमुटपणे नित्यची पाहत जगलो
तळहातीच्याच विधिलिखित रेषा
मौनात मीच सदैव उमगूनी गेलो
जीवन खेळच सारिपाटाचा सारा
प्रारब्ध भाळीचेच भोगीत राहिलो
संचिताचेच रांजण हे गतजन्मांचे
पाहताना जन्मीच कृतार्थ जाहलो
**************************
*20 फेब्रुवारी 2025 ( 16 )*
*वि.ग. सातपुते. ( भावकवी )*