*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री गजानना आठवू निशिदिन*
————————————————-
श्री गजानना आठवू निशीदिन
आज हो श्री गजानन प्रकटदिन ।।
श्रीगजानन या नगरीत राहिले
तीर्थक्षेत्र पवित्र शेगाव हो जाहले
श्रीगुरूंना आठवू या निशीदिन
आज हो श्री गजानन प्रकटदिन ।।
अर्पिती भक्त चिंता मनीच्या
साकडे घाली चरणी सद्गुरूच्या
श्रीगुरूंना आठवू या निशीदिन
आज हो श्री गजानन प्रकटदिन ।।
अर्पण सेवा चरणी श्रीगजाननांच्या
मिटतील साऱ्या चिंता मनीच्या
श्रीगुरूंना आठवू या निशीदिन
आज हो श्री गजानन प्रकटदिन ।।
शेगावी अलोट मेळा हो भक्तांचा
नामघोष दुमदुमे श्री गजाननांचा
श्रीगुरूंना आठवू या निशीदिन
आज हो श्री गजानन प्रकटदिन ।।
आज हो श्री गजानन प्रकटदिन
कवी अरुणदास गुरुचरणी लीन ।।
———————————————-
।। जय गजानन श्री गजानन ।।
।। गण गण गणात बोते ।।
।। गण गण गणात बोते ।।
——— ————————————–
कविता- श्रीगजाननमहाराज प्रकटदिन ।।
कवी-अरुणदास
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
————————————————-