*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिवराज्याभिषेक*
झाला राज्यभिषेक सोहळा
कथा राजाची सांगते
दक्खनचा शिवाजी राजा
ऐकता धन्य आम्हा वाटते…१
वय अवघे होते सोळा
घेतली शपथ स्वराज्याची
शूर मावळे केले हो गोळा
शर्थ केली पराक्रमाची….२
मित्र लाभले शूर धुरंधर
प्रोत्साहन जिजाऊ आईचे
विश्वास सार्थ भवानीवर
आशीर्वाद कोंडदेव गुरुजींचे…३
एकी पाहून मराठ्यांची
हर हर महादेव गर्जूनी
जाणीव राज्य स्थापण्याची
केली तयारी मराठ्यांनी….४
सिंहासन सोन्याचे रत्नजडित
रायगड मनातच हसला
सप्तनद्यांचे पाणी आले
भगवा झेंडा सन्मानित झाला..५
जाणता राजा आमचा शिवाजी
देती जाणकार एकमुखे ग्वाही
राज्य रक्षण्या प्राणांची बाजी
असा राजा पुन्हा होणे नाही…६
प्रतिभा पिटके
अमरावती