You are currently viewing नितेश राणेंच्या माध्यमातून घोणसरी धबधब्यापर्यंत होणार पायवाट; भूमिपूजन समारंभ संपन्न

नितेश राणेंच्या माध्यमातून घोणसरी धबधब्यापर्यंत होणार पायवाट; भूमिपूजन समारंभ संपन्न

नितेश राणेंच्या माध्यमातून घोणसरी धबधब्यापर्यंत होणार पायवाट; भूमिपूजन समारंभ संपन्न

कणकवली

कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील बारमाही वाहणारा सपाटवाडी येथील धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाट आणि रेलिंग कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, घोणसरी प्रभारी सरपंच प्रसाद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वनपर्यटन विकास इको टुरिझम योजनेतून यासाठी निधी मंजूर झाला आहे. यावेळी बोलताना मनोज रावराणे म्हणाले की देवघर धरणामुळे घोणसरी गावाला पर्यटन क्षेत्र म्हणून नावलौकिक मिळाला आहेच. त्यासोबतच आता सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य घोणसरी गावातील सपाटवाडी येथील नयनरम्य धबधब्यामुळे घोणसरी गावाकडे पर्यटकांची पावले वर्षापर्यटनासाठी आणखी वळतील. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी कायम घोणसरी गावातील मतदार आणि ग्रामस्थ राहिले आहेत. त्यामुळे घोणसरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच पालकमंत्री नामदार राणे हे झुकते माप देतील. प्रभारी सरपंच तथा उपसरपंच प्रसाद राणे म्हणाले की, सपाटवाडी येथील धबधबा हा पर्यटकांचे आकर्षणबिंदू आहे. मात्र धबधब्याकडे जाण्यासाठी सुरळीत पायवाट नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती. माजी सभापती मनोज रावराणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाट आणि रेलिंगसाठी विकासनिधी प्राप्त झाला. वनखात्याचे अधिकारी घुणकीकर तसेच होळेकर यांचेही प्रशासकीय कागदपत्र पूर्ततेकामी सहकार्य लाभले. पर्यटकांना आता धबधब्यापर्यंत पोचणे सहज शक्य होणार असल्यामुळे येत्या वर्षा पर्यटन हंगामापासून पर्यटक संख्या वाढीस लागून गावात रोजगार देखील उपलब्ध होईल. यावेळी फोंडाघाट वनपाल धूलू कोळेकर, देवस्थान मानकरी बाबू रावराणे, हेमंत रावराणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक रावराणे, आर. के.घाडी, ग्रापंचायत सदस्य प्राची रावराणे, दीप्ती कारेकर, सुप्रिया आचरेकर, अंकिता परब, सतीश जाधव, अनंत गुरव, मिलिंद मराठे, भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासह वनरक्षक अतुल खोत, अंकुश माने, शुभम पाटील, रोहित सागवेकर, जितेंद्र पोरलेकर, सुधाकर सावंत, बबन बागवे, प्रकाश राणे, नारायण शिर्के, सागर ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा