देवगड :
महाशिवरात्र दिनाचे औचित्य साधून जागर करण्याची प्रथा, परंपरा आजही कायम टिकून आहे. तशीच परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग येथे सालाबादप्रमाणे दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव महापुरुष मंदिरात वार्षिक जागर आयोजित केला असून यानिमित्ताने तालुक्यातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उत्तरवाडा विकास मंडळ, तांबळडेग नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. यावर्षी तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोठा गट प्रथम पारितोषिक रुपये ३०००/- आणि आकर्षक चषक, दुसरा क्रमांक रुपये २०००/- चषक, तिसरा क्रमांक १०००/- चषक तसेच लहान गट रुपये २०००/- आकर्षक चषक, दुसरा क्रमांक रुपये १५००/- चषक, तिसरा क्रमांक रुपये १०००/- चषक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांना चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित स्पर्धाकानी मंडळाचे सचिव उदयनाथ कोयंडे ९४२११९०७७९ आणि निलेश प्रभू ९४०५२१६७४९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.