वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्पृहा दळवी सलग दुसऱ्यांदा प्रथम*
*”महाराष्ट्राची संत परंपरा” विषयावर प्रभावी वक्तृत्व*
*दोडामार्ग
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोडामार्ग केंद्रशाळा नं १ च्या इयत्ता दुसरीतील स्पृहा सुमित दळवी हिने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इयत्ता पहिली ते सातवी या गटात अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.या गटात “महाराष्ट्राची संत परंपरा” हा स्पर्धेचा होता.यामध्ये प्रथम स्पृहा सुमित दळवी दोडामार्ग केंद्रशाळा नं.१, व्दितीय अदिती विवेक चव्हाण एम आर देसाई वेंगुर्ला, तृतीय शुभ्रा सदाशिव अंधारी वेंगुर्ला नंबर १ उत्तेजनार्थ क्रमांक विभागून देण्यात आले यामध्ये सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर केंद्रशाळा बांदा नं १ तर देवेश भगवान नवार परबवाडा नं.१ यांनी पटकावला आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रा.वैभव खानोलकर व डॉ. धुरी यांनी केले.
स्पृहा दळवी हिला केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ या शाळेतील शिक्षकांचे तसेच तिच्या पालकांचे मार्गदर्शन मिळाले.इयत्ता दुसरीतील स्पृहा दळवी ही विविध स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच पुढे दिसून येते त्यामुळे तिचा चाहता वर्ग सुद्धा मोठया प्रमाणात आहे. तिने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे