मालवण (प्रतिनिधी)
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२१फेब्रु. २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग,श्रीमती रश्मी दराद मुख्य महाप्रबंधक नाबार्ड प्रादेशिक कार्यालय पुणे, मिलिंदसेन भालेराव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग,बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे संचालक संदीप परब ,व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा प्रबंधक नाबार्ड श्रीम.दिपाली माळी, सतीश आंगणे अध्यक्ष आंगणेवाडी विकास समिती, नितीन काळे जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने आंगणेवाडी व देउळवाडा गावच्या ग्रामस्थांनी तसेच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी,कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दि.२१फेब्रु.ते दि.२४फेब्रु. २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.