सागरेश्वर-बागायत बीच येथे २२ व २३ फेब्रुवारीला “पतंग महोत्सव”
वेंगुर्ले
पर्यटनाचा ध्यास आणि वेंगुर्ल्याचा विकास या मुख्य उद्देशासाठी स्थापन झालेल्या ‘ माझा वेंगुर्ला या संस्थेच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी दरम्यान उभादांडा येथील श्रीक्षेत्र सागरेश्वर-बागायत बीच भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षीही नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन टीम मेंगलोर, फ्लाय ३६० टीम डहाणू आणि त्यांचे अन्य सहकारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भव्य पतंगबाजीचे दर्शन घडवणार आहेत.
यावेळी पतंगबाजी बरोबरच बीचवरील फन गेम्स, फायर शो, वॉटर स्पोर्टस्, कराओके गायन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच यावर्षी २३ फेब्रुवारीला सायंकाळी हर्षद मेस्त्री प्रस्तुत ‘हर्षनाद जल्लोष मनोरंजनाचा’ हा गायन आणि नृत्याचा कार्यक्रम हे विशेष आकर्षण असणार आहे. यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे श्रीक्षेत्र सागरेश्वर -बागायत बीच येथे संपन्न होणाऱ्या या पतंग महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन माझा वेंगुर्लाच्या वतीने करण्यात आले आहे.