आर.पी.आय. महिला आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी-सौ.निताली कांबळे यांच्या निवडीचे अभिनंदन!
दोडामार्ग
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी -सौ.निताली निलेश कांबळे ,जिल्हा उपाध्यक्षापदी-सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर यांची तर दोडामार्ग तालूकाअध्यक्षापदी -सौ.सरीता रवि पिळगांवकर यांची निवड केल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा तथा दोडामार्ग नगर पंचायत च्या नगरसेविका- सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी पक्षाच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच सावंतवाडी येथील मँगो हॉटेल मध्ये घेण्यात आली .सौ.प्रतिभा दशरथ कांबळे,सौ.प्रगती प्रकाश कांबळे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.