You are currently viewing फोंडा हायस्कूलच्या प्रभात फेरी व विविध स्पर्धा तसेच घोषणांनी शिवजन्मोत्सव उत्साहात!

फोंडा हायस्कूलच्या प्रभात फेरी व विविध स्पर्धा तसेच घोषणांनी शिवजन्मोत्सव उत्साहात!

फोंडा हायस्कूलच्या प्रभात फेरी व विविध स्पर्धा तसेच घोषणांनी शिवजन्मोत्सव उत्साहात!

फोंडाघाट

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम- सेजल हुंबे, द्वितीय- मानसी लाड, तृतीय- तीर्था पवार तर वेशभूषा स्पर्धेत प्रथम- श्रेया डोर्ले,द्वितीय -रावी सावंत तृतीय- स्वराज प्रभू यांनी क्रमांक पटकाविले. समूह गान स्पर्धेत प्रथम -इयत्ता आठवीअ,द्वितीय- अकरावी विज्ञान, तृतीय -इयत्ता नववी, यांनी बक्षिसे मिळवताना उपस्थितांची मने जिंकली..

 

 

नंतर शिवकालीन वेशभूशेतील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेली, प्रभात फेरी बाजारपेठ मार्गे शिवप्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव ठिकाणी एसटी स्टँडवर पोहोचली. त्यामुळे बाजारपेठ आणि एसटी स्टँड परिसर शिवगर्जनेने दुमदुमला. चैतन्याचे वारे वाहत असतानाच, कुमारी नेहा कुम्हार हिची शिवललकारी आसमंतात निनादली.उपक्रमांचे आयोजनामध्ये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यासह एकमेव संचालक संदेश सावंत- पटेल सहभागी झाले होते. या उपक्रमाचे पालक वर्ग आणि व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे —-


प्रतिक्रिया व्यक्त करा