*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी शाहीर मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम पोवाडा*
————————-
*सह्यांद्रीचा हुंकार…..!*
……………………,..
सह्यांद्रीचा हुंकार गर्जतो ।
शिवबाची कहानी ।
करी धूळधान पहा
पाजले शत्रुला त्या पाणी॥ धृ॥
गड किल्ले जिंकले .
गाजविले रणांगण ।
मर्द मराठा उगवला
हेच आम्हा भूषण । शाहीर गाती पवाडे
किर्ती कवनातूनी॥ १
मर्द मराठे लढले
रणसंग्राम तो नवा ।
मरणाला ना भिती
इतिहास तो लिहा ।
जिजाऊ थोर माता
करारी विरांगणी॥२
माझा शिवबा होता
तारामंधी तो एक ।
अलौकीक किर्तीवंत
अपूर्व राज्यभिषेक
भगवी ध्वजा तळपे गगणी॥ ३॥
डफ घेवूनी कवने
गाई शाहीर मनोहर ।
तेजसुर्य हो तळपला
जिजाऊंचा नवांकूर ।
पराक्रमाची बखर ती
इतिहास पानोपानी॥ ४॥
सह्याद्रीचा हुंकार गर्जतो ।
शिवबाची कहानी॥
————————–
मनोहर पवार
केळवदकर ता चिखली, जि बुलढाणा . मो.9850812651.

