*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझा शिवबा…*
इतिहास पुढे सांगेन, आचंद्रसूर्य नांदेल
माझा शिवबा होता महान..तो पिढ्या सर्व गाजेल
हो जी जी र र जी जी….
आता पटली आहे साक्ष, जनता झाली पहा दक्ष
खोदून पाने सोनेरी..आता वेधले हो लक्ष जी जी र र जी…
झाकलं किती कोंबडं, तरी फुटतं पहा तांबडं
सूर्य येत नाही झाकतां, जिकडं तिकडं शिवबाच्या कथा… हो जी र र जी जी जी….
राजा छत्रपती हा माझा, सम्राट होता राष्ट्रांचा
जागोजागी खुणा हो त्याच्या,गड किल्ले, लालमहालाच्या.. हो जी र र जी जी…
पुसणार नाही इतिहास, हे दुर्गम किल्ले गड
इतिहास सांगतील पुढे, हे सारे किल्ले अवघड
हो जी र र जी जी …
ही इतिहासाची पाने, ती मढवलीत सोन्याने
ती विश्व विजयी घोडदौड.. सारी पाहिली हो दुनियेने जी जी र र जी…
नतमस्तक सारे विश्व,अपार उपसले कष्ट
तो सिंहासनी बसून..राष्ट्र केले धष्टपुष्ट
हृदयावर करेल राज .. जी जी जी र र जी….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)