You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

 मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे  बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी  सकाळी  9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवास उपस्थिती (स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली). सकाळी 10.30 वाजता मोटारीने मालवणकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे या कामाच्या पायाभरणी समारंभास उपस्थिती. (स्थळ, किल्ले राजकोट ता. मालवण). दुपारी 12 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. सायं.5 वाजता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल शिवप्रेमी व हिंदू समाज यांच्या माध्यमातून होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रामास उपस्थिती. (स्थळ, कोकण कॉलनी कोलगांव ता. सावंतवाडी). सायं. 6 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. सायं. 7 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. सायं. 7.30 वाजता मोटारीने कासार्डेकडे प्रयाण. रात्री 8 वाजता जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे आयोजित डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेस उपस्थिती (स्थळ, कासार्डे उत्तर गावठाण, ता. कणकवली).रात्री 9.30 वाजता सकल मराठा समाज, कणकवली आयोजित छत्रपतील शिवाजी महाराज जयंती उत्सवास उपस्थिती. (स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली). रात्री 10 वाजता ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.

प्रतिक्रिया व्यक्त करा