You are currently viewing माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे राजकोट येथील हायमास्ट प्रकाशमान

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे राजकोट येथील हायमास्ट प्रकाशमान

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे राजकोट येथील हायमास्ट प्रकाशमान

मालवण

राजकोट येथे नागरिकांच्या मागणीनुसार हायमास्ट टॉवरची उभारणी करण्यात आली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे वीज मिटर जोडणी रखडली. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधले. दीपक पाटकर यांनी वीज वितरण व मालवण नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यातून तांत्रिक बाबी दूर करून वीज मिटर जोडणी पुर्ण झाली. मंगळवारी हायमास्ट प्रकाशमान झाला. याबाबत राजकोट मित्रमंडळाने कार्यसम्राट नेतृत्व दीपक पाटकर मानले आभार मानले आहेत.

यां निमित्ताने दीपक पाटकर म्हणाले, खासदार नारायण राणे साहेब, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यानुसार मालवण शहरांत कार्य सुरूच राहील असेही दीपक पाटकर यांनी यां निमित्ताने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा